शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कधी ना कधी असा प्रश्न पडला असेल की, “माझा पीक विमा मंजूर झाला आहे का?”, “माझी पीक विम्याची पॉलिसी अपलोड झाली आहे का?”, किंवा “माझ्या पीक विम्याचा क्लेम मंजूर झाला आहे का?” यासाठी अनेक वेळा सरकारी कार्यालयात जावे लागते किंवा इतर कोणाला विचारावे लागते. पण आता कोणालाही विचारण्याची गरज नाही. कारण ही संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवर अगदी दोन मिनिटांत पाहू शकता.
आज आपण पीक विमा स्टेटस ऑनलाईन पद्धतीने कसे पाहायचे याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेणार आहोत. तुम्हाला कोणता नंबर सेव्ह करावा लागेल? SMS कसा पाठवायचा? पॉलिसी स्टेटस, क्लेम स्टेटस आणि कॅल्क्युलेशन स्टेटस कसे पाहायचे? हे सर्व आपण या लेखात समजून घेणार आहोत. चला तर मग, सविस्तर माहिती घेऊया.
पीक विमा तपासण्यासाठी अधिकृत नंबर सेव्ह करा
तुम्हाला पीक विम्याची स्थिती जाणून घ्यायची असल्यास, सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये PMFBY चा अधिकृत नंबर सेव्ह करावा लागेल. हा नंबर 7065 70 65 51 44 47 आहे. तो PMFBY (Pradhan Mantri Fasal Bima Yojana) या नावाने सेव्ह करा. नंबर सेव्ह केल्यानंतर तुम्ही पुढील प्रक्रिया करू शकता.
SMS पाठवून माहिती मिळवा
एकदा नंबर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला एक साधा मेसेज पाठवावा लागेल. हा मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला एक मेनू रिप्लायमध्ये मिळेल. या मेनूमध्ये तुम्हाला खालील पर्याय दिसतील –
– पॉलिसी स्टेटस (Policy Status)
– इन्शुरन्स पॉलिसी (Insurance Policy)
– क्रॉप प्लस स्टेटस (Crop Plus Status)
– क्लेम स्टेटस (Claim Status)
– प्रीमियम कॅल्क्युलेटर (Premium Calculator)
तुम्हाला कोणती माहिती हवी आहे त्यावर क्लिक करून पुढील प्रक्रिया करता येईल.
पॉलिसी स्टेटस कसे तपासायचे?
1. मेनूमधून पॉलिसी स्टेटस हा पर्याय निवडा.
2. त्यानंतर तुमच्या हंगामाची माहिती विचारली जाईल –
– रब्बी 2024
– खरीप 2024
– जुनी पॉलिसी – रब्बी 2020, खरीप 2023, खरीप 2022, खरीप 2021
3. तुम्हाला ज्या हंगामाचे स्टेटस पाहायचे आहे तो पर्याय निवडा.
4. त्यानंतर तुमची पॉलिसी, अर्ज क्रमांक, गावाचे नाव, पिकाचे नाव, सर्वे नंबर, भरलेली रक्कम, विमा कंपनीचे नाव आणि भरलेला हप्ता या सर्व माहितीचा तपशील दाखवला जाईल.
5. तुम्हाला तुमच्या पॉलिसीची स्थिती पाहता येईल – ती अपलोड झाली आहे का, पेंडिंग आहे का, रिजेक्ट झाली आहे का?
यामध्ये तुम्ही तुमच्या सर्व पॉलिसी आणि त्यांची विमा रक्कम याबाबतची माहिती सहज पाहू शकता.
क्लेम स्टेटस कसे तपासायचे?
जर तुम्ही पीक विम्याचा क्लेम केला असेल, तर त्याची स्थितीही तुम्ही ऑनलाईन तपासू शकता.
1. मेनूमधून क्लेम स्टेटस हा पर्याय निवडा.
2. त्यानंतर तुम्हाला हंगाम निवडण्याचा पर्याय मिळेल –
– रब्बी 2024
– खरीप 2024
– खरीप 2023
– खरीप 2022, खरीप 2021, रब्बी 2020
3. तुम्ही ज्या वर्षाचा क्लेम स्टेटस तपासू इच्छित आहात तो हंगाम निवडा.
4. जर तुमच्या पॉलिसीवर क्लेम मंजूर झालेला असेल, तर त्याचा तपशील दाखवला जाईल.
5. क्लेम कॅल्क्युलेशन झाले आहे का? रक्कम अपलोड झाली आहे का? पैसे वाटप झाले आहेत का? याची सर्व माहिती येथे मिळेल.
जर तुमचा पीक विम्याचा क्लेम आलेला असेल, तर तो कोणत्या आधारावर मंजूर झाला आहे याचाही तपशील पाहता येईल.
क्लेम कॅल्क्युलेशन स्टेटस कसे पाहायचे?
जर तुम्हाला तुमच्या क्लेमच्या गणनेबाबत (Calculation Status) माहिती पाहायची असेल, तर तुम्ही खालील प्रक्रिया करू शकता –
1. मेनूमधून क्लेम स्टेटस पर्याय निवडा.
2. त्यानंतर तुम्हाला खरीप 2024 किंवा ज्या वर्षाचा स्टेटस पाहायचा आहे तो हंगाम निवडावा लागेल.
3. तुमच्या पॉलिसीचा क्रमांक निवडल्यावर, कॅल्क्युलेशन झालं आहे का, हे तुम्हाला समजेल.
4. जर क्लेम कॅल्क्युलेशन पूर्ण झाले असेल, मंजूर झाले असेल, तर तो विमा किती आहे हे स्पष्टपणे दाखवले जाईल.